
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात शनिवारी भीषण अपघाताची घटना घडली. बैरागढ-चंबा रस्त्यावर देविकोठीजवळ चालुज वळणावर खासगी बस दरीत कोसळली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. बसवरील नियंत्रण सुटल्याने ही अपघाताची घटना घडली.
बसमध्ये चालक आणि वाहकासह अंदाजे 22 जण प्रवास करत होते. देविकोठीजवळ चालुज वळणाजवळ पोहोचताच बसवरील नियंत्रण अचानक सुटले आणि ती एका खोल दरीत कोसळली.
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून सुरू झाल्यापासून पावसाशी संबंधित घटनांमध्ये 64 जणांचा मृत्यू झाला असून, 14 ठिकाणी भूस्खलनाच्या घटनांची नोंद झाली आहे. हवामान विभागाने 12 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.





























































