मुंबई फिरायला चाललेल्या 17 वर्षीय मुलाचा लोकलमधून पडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मित्रांसोबत मुंबईत फिरायला गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मोहम्मद फाजील शफीक अन्सारी असे मयत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, भिवंडीतील रहिवासी असलेला फाजील हा मित्रांसोबत मुंबई फिरायला चालला होता. यासाठी त्यांनी कल्याणहून मुंबईला येणारी लोकल पकडली. फाजील लोकलच्या दाराजवळ उभा राहून प्रवास करत होता. यादरम्यान कळवा स्थानकादरम्यान त्याचा तोल गेला आणि लोकलमधून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.