दिंडोशीत चालकांसाठी शिवसेनेचे मराठी भाषा वर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमराठी रिक्षा चालकांना मराठीचे धडे शिकवण्यासाठी शिवसेनेने ‘मराठी भाषा वर्ग’ सुरू केले आहेत. शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांच्या पुढाकारातून दिंडोशी येथे हा उपक्रम राबवला जात आहे. या वर्गांच्या माध्यमातून शैलेश पांडे यांच्या ‘स्वस्तिक (फ्रेंड्स ऑफ एज्युकेशन)’ या संस्थेकडे या भाषा वर्गांचे नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

रिक्षाचालकांना अत्यंत सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने मराठी भाषा शिकता यावी तसेच परिसरात राहणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱया प्रत्येकाने स्थानिक मराठी भाषेचा आदर केला पाहिजे यासाठी शिवसेनेने हा उपक्रम हाती घेतला आहे. या वर्गांमध्ये दैनंदिन व्यवहारातील शब्द, नम्र संभाषण, प्रवाशांशी बोलायचे छोटे-छोटे संवाद आणि ट्रफिक नियमावली याबाबतचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमाला अमराठी नागरिक, प्रवासी आणि रिक्षाचालक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.