
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला हा राज्य सरकार पुरस्कृत होता. या घटनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पूर्ण पाठिंबा होता आणि मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी हा हल्ला घडवून आणला, असा खळबळजनक आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी सोमवारी केला. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले, “ममता बॅनर्जी या केवळ तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा नाहीत, तर एका प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत मुख्यमंत्रीपदासह अनेक महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या त्या एक ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांच्यावरील हल्ला हा पूर्णपणे राज्य सरकार पुरस्कृत होता. या हल्ल्यातील हल्लेखोरांना यापूर्वी अनेकदा भाजप नेत्यांसोबत पाहिले गेले आहे. त्यांना कोणताही विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नसून, विरोधी पक्षनेत्यांना संपवायचे आहे.”
ते पुढे म्हणाले, “सध्याचा तथाकथित विरोधी पक्ष (TMC गद्दार आमदार) हा केवळ भाजपची बी-टीम आहे. त्यांनी बंगाल उद्ध्वस्त केला आहे. निवडणुकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन त्यांनी पाळलेले नाही. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा या घटनेला पूर्ण पाठिंबा होता आणि मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी हा हल्ला घडवून आणला केली.”

























































