
अवघ्या चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याला कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
15 ऑगस्टनिमित्तच्या समारंभासाठी दिल्ली पोलीस आणि अर्धसैनिक दलाचे जवळपास 20 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच 1 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कार्यक्रमासाठी देशभरातून जवळपास 25 हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. प्रचंड गर्दीत येणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी अॅपचा आणि फेशियल रिकग्निशन सिस्टम टेक्नोलॉजीचा वापर केला जात आहे.
ड्रोनने होणार मॉनिटरिंग
लाल किल्ल्याजवळील परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी ड्रोनने नजर ठेवली जाईल. सुरक्षेच्या कारणांमुळे 15 ऑगस्टपर्यंत स्मारकाजवळ पतंग उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. अनधिकृत हवाई उड्डाण रोखण्यासाठी अँटी ड्रोन सिस्टम बसवण्यात आली आहे. टप्प्याटप्यांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.






























































