
मुंबई पालिकेकडून मुंबईतील पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोडवर आधारित ओळखपत्र देण्यात येत आहे. मात्र या ओळखपत्रांसाठी पालिका तब्बल पावणे दोन कोटींचा खर्च करणार आहे. पालिकेकडून आतापर्यंत 55 हजार फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्यात आले आहे.
फेरीवाल्यांवर होत असलेल्या कारवाईनंतर त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पेटला गेला. या प्रकरणात फेरीवाल्यांच्या काही संघटना न्यायालयात गेल्यानंतर यावर न्यायालयाने निर्देश देत ज्यांची मुंबई पालिका हद्दीतील सर्वेक्षणात नोंद झाली आहे, अशा 99, 435 फेरीवाल्यांना क्यूआर कोडसहित ओळखपत्र देण्यास पालिकेला सांगितले. त्यामुळे न्यायालयाच्या न्यायालयाच्या निर्देशानुसार फेरीवाल्यांना क्यूआर कोड देण्यात येत आहेत. 31 ऑगस्टपर्यंत ही संपूर्ण कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.
































































