क्या हुआ तेरा वादा… ‘फिर रफी’ मैफलीत रसिक मंत्रमुग्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
phir-rafi-musical-concert-mumbai-shrikant-narayan-125th-solo-show-tribute

‘एक हसीन शाम को’, ‘ये जो चिलमन है’, ‘क्या हुआ तेरा वादा’, ‘गुलाबी आँखे जो तेरी देखी’ अशा सुरांचे बादशहा मोहम्मद रफी यांच्या अजरामर गीतांची जादू मुंबईकरांना पुन्हा एकदा अनुभवता आली. निमित्त होते ते ‘फिर रफी’ या कार्यक्रमाचे. रसिकप्रेक्षकांनी या कार्यक्रमाला हाऊसफुल्ल दाद दिली. काळ बदलला, पिढय़ा बदलल्या तरी रफी यांची जादू आजही रसिकांच्या मनावर कायम असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

प्रख्यात पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गेली 21 वर्षे ‘जीवनगाणी’चे प्रसाद महाडकर यांच्यावतीने दरवर्षी ‘फिर रफी’ या मैफलीचे आयोजन केले जाते. यंदाही 30 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत ही मैफल मुंबईत रंगली. श्रीकांत नारायण यांनी रफी यांची सोलो, अनप्लग्ड, डय़ुएट अशी विविध जॉनरची रफी यांची गाजलेली गाणी सादर करत प्रेक्षकांचा वन्स मोअर मिळवला. विशेष म्हणजे श्रीकांत नारायण यांचा हा 125वा सोलो कार्यक्रम होता. गायिका प्राजक्ता सातर्डेकर यांनी त्यांना साथ दिली.