
श्रावण महिना सुरू झाला असून, कावड यात्रा जोरात सुरू आहे. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बाईकवर पांढऱया रंगाचे केस असणारे (फर) आवरण घालून, हेडलाईटच्या वरच्या भागात हुबेहूब नंदीचा चेहरा तयार करण्यात आला आहे. बाईकस्वार तरुणाला हे वाहन बनवण्यासाठी तीन दिवस आणि अंदाजे 15 हजार रुपये लागले. हा तरुण बरेलीहून वाराणसीसाठी निघाला आहे. @unseenbarish नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ दोन कोटी बावीस लाख सहा हजार जणांनी पहिला आहे. 2 लाख 14 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. हा अनोखा जुगाड पाहून काहींनी यातील कलाकुसरीचे काwतुक केले आहे, तर सुरक्षिततेच्या मुद्दय़ावर काहींनी चिंताही व्यक्त केली आहे.




























































