असं झालं तर… एसआयपीचा परतावा घटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्युच्युअल फंड योजनेला जोखण्यासाठी एक वर्षाचा कालावधी फारच कमी ठरतो. गुंतवणूकदारांनी फंड मॅनेजरला तीन ते पाच वर्षांचा कालावधी द्यायला पाहिजे.

एखादी योजना तीन वर्षांनंतरही अपेक्षित परिणाम साधत नसल्यास गुंतवणूकदारांनी योग्य अभ्यास करून चांगला परतावा देणाऱ्या योजनेकडे वळायला हवे.

एसआयपीचा किमान कालावधी सहा महिन्यांचा असावा. बहुतांश फंड हाऊस हा संकेत पाळतात. गुंतवणूकदार 3, 5 किंवा त्याहून अधिक कालावधी निश्चित करू शकतात.

बाजारात घसरण सुरू असेल आणि परतावा कमी झाला तर घाईने गुंतवणूक थांबवू नका. या काळात एसआयपी सुरू ठेवणे फायदेशीर ठरू शकते.

एसआयपीमध्ये तात्पुरता तोटा नैसर्गिक बाब आहे. बाजारातील स्थिती, फंडाची कामगिरी, बेंचमार्कशी तुलना, फंड व्यवस्थापनातील बदल यांचा एकत्रित विचार करून निर्णय घ्या.