
आयबीपीएसतर्फे कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स (सीएसए) या पदासाठी विविध बँकांमध्ये 11,403 जागांसाठी नोकरभरती करण्यात येणार आहे. या नोकरभरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांची भरती झालीच पाहिजे, या न्याय्य मागणीसाठी शिवसेनाप्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे ऑनलाइन, ऑफलाइन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर नोकरभरतीसाठी जास्तीत जास्त भूमिपुत्रांनी अर्ज करावेत, असे आवाहन महासंघातर्फे करण्यात आले आहे.
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते – खासदार अनिल देसाई, महासंघ कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, महासंघ सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या सूचनेनुसार सदर नोकरभरतीपूर्व परीक्षेचे ऑनलाइन व ऑफलाइन प्रशिक्षण वर्ग महासंघातर्फे घेण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ कार्यालय, पहिला मजला, शिवसेना भवन येथे रविवार व सुट्टीचे दिवस वगळून सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत चिटणीस शरद एक्के (9892699215), श्रीराम विश्वासराव (9869588469), विलास जाधव (9619118999), उल्हास बिले (9821878441) यांच्याशी संपर्क साधावा, असे महासंघाचे चिटणीस व प्रशिक्षण वर्गप्रमुख उमेश नाईक यांनी कळवले आहे.
आयबीपीएसतर्फे होणाऱ्या या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी या नोकरभरतीकरिता www.ibps.in या संकेतस्थळावर 21 ऑगस्टपर्यंत अर्ज करावयाचा आहे. उमेदवाराचे वय सर्वसाधारण वर्गाकरिता शासकीय नियमानुसार असेल, तसेच आरक्षित प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादेत शासकीय नियमानुसार सवलत, शिथिलता असेल.




























































