
खींचो न कमान को,
न तलवार निकालो
जब तोप मुकाबिल हो,
तो अखबार निकालो…
या ओळी सार्थ ठरवत धारदार शब्द आणि व्यंगचित्रांतून मराठी मनात अस्मितेचा अंगार फुलवणाऱ्या साप्ताहिक ‘मार्मिक’चा गुरुवारी 66वा वर्धापन दिन आहे.
मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’ची स्थापना केली. 13 ऑगस्ट 1960 रोजी ‘मार्मिक’चा पहिला अंक प्रकाशित झाला. ‘मार्मिक’ने मराठी माणसाला जागेच केले नाही तर एकजूटही केले. त्यातूनच पुढे ‘शिवसेना’ ही मराठी माणसांची बलाढय़ संघटना उभी राहिली आणि शिवसेनेने मराठी माणसाचा आवाज बुलंद केला. ‘मार्मिक’ हे एका अर्थाने मराठी माणसाच्या लढय़ाचे प्रतीक आहे.































































