
ठाण्याच्या प्रभाग क्रमांक १३मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तयज्ञास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात जवळपास १४० पिशव्या रक्त संकलन करण्यात आले असून शिवसैनिकांसह, महिला आणि तरुणांनी भाग घेतला. शिवसेनेचे नगरसेवक शहाजी (गणेश) खुस्पे यांच्या पुढाकाराने या रक्तयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.
ठाण्यात रक्ताची मागणी खूप वाढलेली असल्याने प्रभाग क्रमांक १३मधील शिवसेना नगरसेवक शहाजी (गणेश) खुस्पे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. लोकमान्य टिसा ब्लड बँक आणि शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबविण्यात आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरणार
ज्येष्ठ शिवसैनिक विनायक सुर्वे यांनी स्वतः रक्तदान करून नवा आदर्श ठेवला. आज संकलित केलेले हे रक्त आपत्कालीन परिस्थितीत गरजूंना अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी आयोजकांनी व्यक्त केला.
सकाळी १० वाजता या शिबिराला सुरुवात झाली होती तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल १४० जणांनी या उपक्रमात सहभाग घेतला. दरम्यान प्रभागातील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते शिवसैनिक व रक्तदात्यांचा गौरव करण्यात आला.































































