
हैदराबादमधील विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत यांना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविण्यास विरोध केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता बंगळुरूमधील एका विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पदवीदान समारंभाला सरन्यायाधीश यांच्या उपस्थितीला विरोध केला आहे.
‘नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी’च्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आगामी दीक्षांत समारंभासाठी सरन्यायाधीश सूर्य कांत आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांच्या उपस्थितीला विरोध दर्शविला आहे.
निमंत्रण स्वीकारलंच नाही
नालासारकडून देण्यात आलेले निमंत्रण मी स्वीकारलंच नव्हतं. त्यामुळे दीक्षांत समारंभाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी म्हटले आहे. नालासार विद्यापीठाने परंपरेनुसार सरन्यायाधीशांना दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. हा समारंभ ऑगस्टअखेरीस किंवा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.






























































