राहुल गांधींचे सोरेन यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनाचा दबाव वाढला आहे. विद्यार्थी आंदोलनाची दखल घेत काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना यासंबंधी पत्र लिहिले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि मागण्या समजून घेऊन त्यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असे राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून विनंती केली आहे. भरती प्रक्रियेत कथित अनियमिततावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.