
रायगड जिह्यातील कर्जत-कोंदिवडे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत रिपार्टिंग करून सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या मुलींनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मुलींना तुम्ही मोठं होऊन रिपोर्टर होणार आहात का? असा प्रश्न विचारला. त्यावर मुलींनी नाही असे उत्तर दिले.
काsंदिवडे गावातल्या दोन मुलींनी रस्त्यावर पडलेल्या छत्रीलाच माईक बनवत रस्त्यावरच्या खड्डय़ांबाबत व्हिडीओ केला होता. याला संपूर्ण देशभरात प्रसिद्धी मिळाली होती. मुलींनी केलेले हटके कव्हरेज केवळ कोंदविडे गावापुरते मर्यादित असले तरी राज्यभरातील खड्डय़ांनाच त्यांनी वाचा फोडली होती.
या मुलींशी सोमवारी राज ठाकरेंनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी मुलींना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. कोण कोणत्या वर्गात शिकते याची माहिती जाणून घेतली. तुम्ही अभ्यास करताय ना? असेही राज ठाकरे यांनी विचारले. त्यावर आम्ही अभ्यास करतो. पण आमचे तीन ते चार तास असेच वाया जातात असे त्या म्हणाल्या.




























































