
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात उद्या मंगळवारी होणार आहे. सलग तिसऱ्या आठवडय़ात होत असलेल्या या सुनावणीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल हे उर्वरित युक्तिवाद करणार आहेत.




























































