टोल नाक्यांच्या परिसरातील नागरिकांसाठी फास्टॅग आला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय महामार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या आणि टोल नाक्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक नवा मासिक पास आणला आहे. हा पास देशातील एकूण 121 टोल प्लाझांवर चालणार आहे. स्थानिक वाहनचालकांना दररोज लागणाऱ्या टोलच्या भुर्दंडापासून मुक्ती मिळणार असून अवघ्या 350 रुपयांत एका महिन्यासाठी अमर्याद लोकल पास उपलब्ध असणार आहे.

या सुविधेचा लाभ टोल प्लाझाच्या 20 किलोमीटरपर्यंत राहणाऱ्या नागरिकांना होईल. हा पास केवळ वैयक्तिक आणि अव्यावसायिक वाहनांसाठीच वैध असेल. व्यावसायिक वापराच्या वाहनांना ही सवलत लागू राहणार नाही. याआधी पास मिळवण्यासाठी वाहनचालकांना प्रत्यक्ष टोल नाक्यावर जाऊन कागदपत्रे जमा करावी लागत होती. परंतु, आता ही प्रकिया ऑनलाइन करण्यात आली आहे. पात्र वाहनचालक राजमार्ग यात्रा अॅपच्या माध्यमातून थेट अर्ज करू शकतात.