भुलेश्वरमध्ये गणेशमूर्ती कलंडली, दोघांचा मृत्यू; पाचजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भुलेश्वरमध्ये आज गणेशमूर्ती आगमनाच्या वेळी मूर्ती कलंडून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला तर पाचजण जखमी झाले. ‘भुलेश्वरचा राजा’ आगमन मिरवणुकीत मंडपाच्या अगदी जवळच मूर्ती आली असताना रात्री 9 वाजता ही दुर्घटना घडली.

अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भुलेश्वरच्या राजाची 27 फुटी मूर्तीची शनिवारी रात्री मिरवणूक काढण्यात येथ होती. परळ येथून भुलेश्वर येथे मूर्ती नेत असताना रात्री नऊच्या सुमारास कबुतरखाना, जय अंबे चौक येथे मूर्ती कलंडली. यामध्ये काहीजण अडकले गेले. यात पाचजण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. जखमींना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पालिकेच्या अग्निशमन दलाने तसेच पोलिसांनी तत्काळ धाव घेत मूर्ती व इतर साहित्य हटवण्याचे काम हाती घेतले.