
‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या १८व्या मासिक कार्यक्रमानिमित्त ओरोस येथे ‘श्रावणधारा’ कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कविसंमेलनात ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या संमेलनात १५ कवींनी सादर केलेल्या कवितांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
धामणस्कर यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर कविसंमेलनाला सुरुवात करण्यात आली. संमेलनादरम्यान संध्या तांबे, डॉ. सई लळीत, सुरेश पवार, पुरुषोत्तम कदम, सुधीर गोठणकर, मधुकर जाधव, नम्रता रासम, प्रगती पाताडे, मनोहर सरमळकर, मिताली मुळीक, मनीषा पाताडे, सीमा मसुरेकर, सुस्मिता राणे, आर्या बागवे, अपर्णा जोशी यांनी वेगवेगळ्या विषयांवरील कविता सादर केल्या. यावेळी समन्वयक सतीश लळीत, ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे, कवी सुरेश पवार, ग्रामपंचायत सदस्या प्रिया आजगावकर, डॉ. संदीप नाटेकर, डॉ. प्रतिमा नाटेकर, विष्णुप्रसाद दळवी उपस्थित होते.






























































