
ब्रिटीश संसदेतील पहिले हिंदुस्थानी खासदार आणि राष्ट्रवादी नेते दादाभाई नौरोजी यांचे एक ऐतिहासिक तैलचित्र लंडनमधील नॅशनल पोर्ट्रेट गॅलरीमध्ये नव्याने प्रदर्शित केले जाणार आहे. कलाकार सोराब एम. पिठावाला यांनी रेखाटलेले हे तैलचित्र 70 वर्षांहून अधिक काळ स्ट्रँड येथील इंडिया क्लबमध्ये होते. मात्र तीन वर्षांपूर्वी या रेस्टॉरंटचा भाडेकरार संपला.
इंडिया क्लबचा भाडेकरार संपल्याने नौरोजी यांच्या तैलचित्रासाठी व्यवस्थापक यादगार मार्कर यांनी जगातील सर्वोत्तम व्यक्तिचित्र संग्रह असलेल्या लंडनमधील या प्रतिष्ठित गॅलरीशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. हे तैलचित्र आता पुढील बुधवारपासून लोकांसाठी खुले होणार आहे.

























































