कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला अटक, वकील दीपक खत्री पोलिसांच्या जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईची टोळी देशात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. यामध्ये बिश्नोईची कायदेशीर टीम सुद्धा सक्रिय आहे. याच कायदेशीर टीमशी संबंधित वकील दीपक खत्रीविरोधात पोलिसांनी लुकआउट सर्क्युलर जारी केले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानळावरून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक खत्री हा विविध गुन्हेगारी टोळ्यांच्या सदस्यांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत असल्याचा आणि त्यांच्यात परस्परांशी संवाद साधण्यास मदत करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात दिल्लीतील यमुना बाजार परिसरातील हनुमान मंदिरा जवळ खत्री आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गोळीबाराची एक घटना घडली होती. या गोळीबाराच्या घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि गुंडांमध्ये संवाद घडवून आणण्यात खत्रीची काय भूमिका होती? याबाबत सध्या पोलीस कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी कोणकोणती कलमे दाखल केली आहेत आणि या प्रकरणातील पुढील तपशील अद्याप समोर आलेले नाहीत, ज्याचा पोलीस तपास करत आहेत. PTI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.