Ratnagiri News – हर्णे समुद्रात गुजराती बोटीची स्थानिक मासेमारी बोटीला धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हर्णे समुद्रात खोल समुद्रात मासेमारीदरम्यान गुजरातमधील एका मासेमारी बोटीने स्थानिक मासेमाराच्या बोटीला धडक दिली. महेश वाघे यांच्या मालकीची ही बोट असून धडकेत बोटीचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच हर्णे बंदरातील स्थानिक मासेमारांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत महेश वाघे यांची नुकसानग्रस्त बोट सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणली. धडक देणाऱ्या गुजरातमधील बोटीलाही हर्णे बंदरात आणण्यात आले.

या घटनेनंतर समुद्रात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गुजरातमधील बोटमालकांनी आपली चूक मान्य करून नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शवल्याने प्रकरण प्राथमिक पातळीवर मिटल्याचे समजते. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.