
जम्मू-कश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी एक वाहन रस्त्यावरून घसरून दरीत कोसळले. या अपघातात दोन महिलांसह किमान सहा जण ठार झाले आणि तीन जण जखमी झाले. सुरनकोटमधील शेलधार भागात हा अपघात झाला. जखमींपैकी एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अपघातातील मृत व्यक्तींचे वय 20 ते 25 वर्षे आहे. अपघातानंतर त्वरित बचावकार्य सुरू करण्यात आले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मृतांमध्ये चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.

























































