शहापूरच्या टेंभे आश्रमशाळेत २१ विद्यार्थिनींचा विनयभंग, हेच का सरकारचे ‘बेटी बचाव’… स्वयंपाकगृहातील मदतनीसाला अटक पोक्सोचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Manipur Gang Rape Victim Passes Away After 2-Year Struggle for Life

याच्या आश्रमशाळांमधील विविध नकार चव्हाट्यावर येत असतानाच पूरच्या टेंभे आदिवासी आश्रमशाळेत पिजनक प्रकार घडला आहे. २१ पवयीन विद्यर्थिनींचा स्वयंपाकगृहात न करणाऱ्या मदतनीसानेच विनयभंग का असून या घटनेमुळे मुलींमध्ये ड भीती निर्माण झाली आहे. गणपत ळी असे विनयभंग करणाऱ्याचे नाव है. पोलिसांनी तातडीने पोक्सो अंतर्गत न दाखल करून गवळी याला अटक ली आहे. सरकारी आश्रमशाळेत कणाऱ्या आमच्या मुली सुरक्षित नसून का तुमचे ‘बेटी बचाव’ असा संतप्त ाल पालकांनी केला आहे.

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत गेल्या दीड वर्षापासून शहापूर तालुक्यात टेंभे आश्रमशाळा असून तेथे मुले व मुली मिळून एकूण पावणेचारशे विद्यार्थी शिकतात. त्याच ठिकाणी वसतीगृहदेखील आहे. दुर्गम भागांतील विद्यार्थी तिथे शिक्षण घेत असून पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. आश्रमशाळेच्या आवारातच असलेल्या स्वयंपाकगृहात गणपत गवळी हा मदतनीस म्हणून काम करतो. जेवण झाल्यानंतर ताट धुण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या हात, दंड, पाठ व विविध अंगाला स्पर्श करून विनयभंग केला.

एका मुलीने हा संपूर्ण प्रकार धाडस करून आपल्या शिक्षकाला सांगितला. संबंधित शिक्षकाने ही बाब आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी या घटनेची तत्काळ दखल घेत आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दीपक पाटील यांना लगेच शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर विनयभंग करणारा गणपत गवळी याला अटक केली असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमुळे आश्रमशाळेतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

निलंबित करूनही आरोपी कामावर कसा?
टेंभे आश्रमशाळेतील गणपत गवळी याने दुसऱ्यांदा मुलींचा विनयभंग केला असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी त्याने असेच कृत्य केले होते. मात्र त्याला लगेच निलंबित करण्यात आले. तरीदेखील त्याला पुन्हा कामावर कसे घेतले, असा सवाल विचारला जात आहे.

आश्रमशाळेतील २१ अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा प्रकार हा अतिशय गंभीर आहे. त्यांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्यांवरदेखील कठोर कारवाई करा. यापूर्वी निलंबित असूनही आरोपीला पुन्हा कामावर का व कोणी घेतले याचीही तातडीने सखोल चौकशी करा. – बाळा धानके (शिवसेना, तालुकाप्रमुख)