
ऑस्ट्रेलियाच्या अंडर-१९ संघाच्या हिंदुस्थान दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने टीम इंडियाच्या अंडर-१९ संघाची घोषणा केली आहे. पुरुष निवड समितीने तीन एकदिवसीय (ODI) सामने आणि मल्टी-डे सामन्यांसाठी वेगवेगळ्या संघांची निवड केली आहे.
या संघात टीम इंडियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याचा मुलगा आर्यवीर सेहवाग आणि राहुल द्रविड याचा मुलगा अन्वय द्रविड यांना एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. बीसीसीआयचे मानद सचिव देवजीत सैकिया यांनी या संघाची अधिकृत घोषणा केली.
एकदिवसीय संघाचे कर्णधारपद लक्ष्य रायचंदानी याच्याकडे सोपवण्यात आले असून यशवर्धन चौहान उपकर्णधार असेल. तर मल्टी-डे सामन्यांसाठी यशवर्धन चौहान संघाचे नेतृत्व करेल, तर लक्ष्य रायचंदानी उपकर्णधारपदाची धुरा सांभाळेल.
अंडर-१९ संघ:
एकदिवसीय संघ: लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), यशवर्धन चौहान (उपकर्णधार), रजत बघेल (यष्टिरक्षक), आर्यवीर सेहवाग, व्ही. के. विनीत, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (यष्टिरक्षक), व्ही. यशवीर, रोहित यादव, शाविन विनोद, मोहित उलवा, चिगुरुपती वेंकट आणि काव्या पटेल.
मल्टी-डे संघ: यशवर्धन चौहान (कर्णधार), लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), सागर विर्क, कुशाग्र ओझा, मनाल चौहान, कुश पटेल, मानव कृष्णा (यष्टिरक्षक), अभिप्राय बिस्वास (यष्टिरक्षक), रोहित यादव, ईशान ओम, अयान अक्रम, प्रणव राघवेंद्र, प्रियांशु सिंह, मोहित उलवा आणि आर्यन यादव.
दौऱ्याचे वेळापत्रक:
१८ सप्टेंबर २०२६ (शुक्रवार): पहिला एकदिवसीय सामना, राजकोट (सकाळी ९:००)
२१ सप्टेंबर २०२६ (सोमवार): दुसरा एकदिवसीय सामना, राजकोट (सकाळी ९:००)
२३ सप्टेंबर २०२६ (बुधवार): तिसरा एकदिवसीय सामना, राजकोट (सकाळी ९:००)
२७ ते ३० सप्टेंबर २०२६: पहिला मल्टी-डे सामना, राजकोट (सकाळी ९:३०)
५ ते ८ ऑक्टोबर २०२६: दुसरा मल्टी-डे सामना, अहमदाबाद ‘बी’ ग्राउंड (सकाळी ९:३०)


























































