रक्षाबंधन कधी,कसे करावे? जाणून घ्या शुभ मुहूर्त…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदा रक्षावंधनला चंद्रग्रहणाचा योगही जुळून येत आहे. त्यामुळे रक्षाबंधन नेमके कधी साजरे करावे, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.रक्षाबंधनच्या दिवशी चंद्रग्रहण असेल तरी ते हिंदुस्थानात दिसणैर नसल्याने ग्रहणाचा सूतककाळ मान्य नसेल. तसेच ग्रहणाबाबतचे कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही. आता रक्षबंधन नेमके कोणत्या वेळी करावे, याच्या शुभे वेळा जाणून घेऊ.

यावर्षी पौर्णिमा २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०८ च्या सुमारास सुरू होईल आणि २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९:४८ च्या सुमारास संपेल. उदय तिथीनुसार, रक्षाबंधन शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२६ रोजी साजरे केले जाईल. तसेच या दिवशी बहिणीनी भावाला राखी बांधावी.

२८ ऑगस्टच्या सकाळी पौर्णिमा असेल आणि या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतील. मात्र, रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळात विशेष खबरदारी घेतली जाते, कारण भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करण्यास मनाई असते. यावर्षी, २७ ऑगस्ट रोजी, भद्राचा प्रभाव सकाळी ९:०८ ते रात्री ९:३२ पर्यंत असेल. याचा अर्थ भद्रा २७ ऑगस्टच्या रात्रीपर्यंत संपेल. त्यामुळे २८ ऑगस्ट रोजी राखी बांधण्यात भद्रा काळाचा अडथळा येणार नाही.

२८ ऑगस्ट रोजी राखी बांधण्यासाठी पहिला शुभ मुहूर्त सकाळी ६:२३ ते सकाळी ९:४८ पर्यंत असेल. दरम्यान, सकाळी १०:१२ ते दुपारी १२:२० पर्यंत राहूकाळ असेल, त्यामुळे या काळात राखी बांधणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

रक्षाबंधनसाठी दिवसभरातील मूहूर्त

अभिजीत मुहूर्त: दुपारी १२:०४ ते १२:५३
शुभ चौघडिया: दुपारी १२:२८ ते २:०३
दुपारचा काळ: दुपारी १:४४ ते ४:१६
चर चौघडिया: सायंकाळी ५:१३ ते ६:४८

रक्षाबंधन पूजन विधी

सर्वप्रथम, घरातील देवघरात पूजेचे ताट ठेवा. भगवान गणेश, भगवान विष्णू आणि आपल्या इष्ट देवतेची पूजा करा. पहिली राखी भगवान गणेश किंवा भगवान कृष्णाला अर्पण करा. त्यानंतर, भावाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून डोक्यावर टोपी घालून आसनावर बसवा.

बहिणीने भावाच्या कपाळावर कुंकू किंवा टिळा लावावा आणि अक्षता लावाव्या. त्याच्या उजव्या मनगटावर शुभेच्छा देत राखी बांधा. त्याला दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळण्यासाठी दिव्याने आरती ओवाळावी.त्यानंतर, मिठाई द्या. मग भाऊ आपल्या बहिणीच्या पायांना स्पर्श करतो, आशीर्वाद घेतो आणि संरक्षणाचे वचन देऊन भेटवस्तू देतो.

राखी कशी असावी?

राखी लाल, पिवळा आणि पांढरा अशा तीन धाग्यांची बनलेली असावी. राखीला चंदनाचा लेप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. दुसरे काहीही उपलब्ध नसल्यास, तुम्ही भक्तिभावाने पवित्र धागा देखील बांधू शकता.