
भाजपचे छत्तीसगडचे खासदार भोजराज नाग यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य केले आहे. ‘मी लिंबू कापून पाऊस थांबवला,’ असे भोजराज नाग म्हणाले. ‘मुख्यमंत्री इथे येणार होते. पण मला कळले की वातावरण खराब आहे. मुसळधार पाऊस होणार आहे. मग मी महादेवाकडे प्रार्थना केली आणि लिंबू कापला व पाऊस थांबवला,’ असे ते म्हणाले.



























































