
लॉर्ड्सवर सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने धक्कादायक निर्णय घेतला. नियमित कर्णधार सलमान अली आगा याला वगळून माजी कर्णधार बाबर आझमकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. मैदानावर संघाचे नेतृत्व करणाऱ्या कर्णधारालाच अंतिम संघातून बाहेर ठेवण्याचा हा निर्णय पाकिस्तान क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. सलमानला वगळण्याचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नसले, तरी त्याच्या अनुपस्थितीत बाबरवर नेतृत्वाची मोठी जबाबदारी आली आहे. त्यामुळे लॉर्ड्सवरील दुसरी कसोटी केवळ इंग्लंड-पाकिस्तान लढत न राहता पाकिस्तानच्या संघनिवडीतील नाटय़ाचीही साक्षीदार ठरली आहे.
























































