Photo – वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा साजरी, आनंदसोहळ्यात आदित्य ठाकरे सहभागी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील वरळी कोळीवाडा येथे कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमा साजरी केली. या आनंदसोहळ्यात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे सहभागी झाले. आदित्य ठाकरे यांनी कोळी बांधवांच्या सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी दर्या सागराला साकडं घातलं. कोळी बांधवांची मेहनत, त्यांची समृद्ध सागरी परंपरा आणि संस्कृती सदैव बहरत राहो, ही प्रार्थना केली. तसेच सर्व कोळी बांधव आणि भगिनींना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.