IND Vs SL Test Series – सोनल दिनुषाने हिंदुस्थानचे मनसुबे उधळले, सामना अनिर्णीत; टीम इंडियाने मालिका जिंकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये खेळली गेलेली दोन सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाने 1-0 ने जिंकली आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर दुसरा सामना खिशात घालून 2-0 ने मालिका जिंकून श्रीलंकेला चीरमुंड्या चित करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न होता. मात्र, सोनल दिनुषाने दोन्ही डावात केलेल्या दमदार फलंदाजीमुळे टीम इंडियाच श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्याच स्वप्न अपूर्ण राहिलं. फॉलोऑन देऊनही श्रीलंकेच्या फलंदाजांनी दाखवलेल्या जिद्दीमुळे भारताच्या विजयाची संधी हुकली, ज्याचा थेट फटका भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) गुणतक्त्याला बसला आहे.

या सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज सोनल दिनुषा दोन्ही डावांत शतके झळकावून संघाचा खरा हिरो ठरला. त्याने पहिल्या डावात 103 आणि दुसऱ्या डावात नाबाद 133 धावांची खेळी करत हिंदुस्थानच्या विजयावर पाणी फेरले. विशेष म्हणजे, 1997 नंतर कसोटीच्या दोन्ही डावांत शतक झळकावणारा तो श्रीलंकेचा पहिला फलंदाज ठरला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 503/9 धावांवर डाव घोषित केला होता, प्रत्युत्तरात श्रीलंकेने दुसऱ्या डावात 429/9 धावा करत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले.

या अनिर्णीत सामन्यामुळे हिंदुस्थान आणि श्रीलंका दोन्ही संघांना प्रत्येकी 4 गुण मिळाले असून, हिंदुस्थानचे गुण 51.51 वर आले आहे आणि संघ पाचव्या स्थानावर कायम आहे. सध्या WTC गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया 80 च्या PCT सह पहिल्या, तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. आता टीम इंडियाचे लक्ष आगामी व्हाईट बॉल सिरिजवर असून, WTC फायनलच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी हिंदुस्थानला पुढील 7 कसोटी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.