मंदिरे, मठांना हात न लावता पंढरपूरचा विकास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूरमधील जुनी मंदिरे आणि मठ यांचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांना हातही न लावता पंढरपूरचा विकास केला जाईल. कोणतेही मंदिर किंवा मठ स्थलांतरित केला जाणार नाही तसेच बाधितांचे पुनर्वसन करताना दुकानांना दुकान आणि घरांना घर दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा मागील मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाला होता, परंतु त्यातून सर्व घटकांचे समाधान न झाल्याने तो निर्णय रद्द करून नव्याने बैङ्गक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठक पार पडली. विकास आराखडय़ामुळे बाधित होणारे दुकानदार, रहिवासी आणि इतर व्यावसायिक यांच्या पुनर्वसनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील. पंढरपूरमधील जमीन व मालमत्ता अधिग्रहणासाठी देण्यात येणारा मोबदला हा थेट मुंबईतील दरांच्या धर्तीवर देण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.