
नेपाळमधील प्रलयकारी महापुरात नाशिक जिल्ह्यातील पन्नासहून अधिक पर्यटक अडकले आहेत. ते सर्व सुरक्षित असून सरकारने लवकरात लवकर मदत करून आम्हाला नाशिकला परत आणावे, अशी विनवणी ते करीत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून या पर्यटकांशी संपर्क साधण्यात आला आहे.
नाशिक शहरातील रहिवासी असलेले चाळीस पर्यटक खासगी ट्रॅव्हल्सने कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेले आहेत. चार दिवसांपासून ते परत येण्यासाठी परिचित, नातलग आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क करीत आहेत. नेपाळ दूतावासाबरोबर महाराष्ट्र सरकारचा संपर्क सुरू आहे. सर्व पर्यटक सुखरूप आहेत. नेपाळ सरकारकडून योग्य ती मदत केली जात आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.





























































