बनावट स्क्रीन शॉट पाठवून, व्यापाऱ्यांची करोडोंची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाखो रुपयांची खरेदी करायची पिंवा ऑर्डर करून किमती वस्तू मागवायच्या आणि बनावट पह्न पे स्क्रीन शॉट/यूटीआर पाठवून व्यापाऱयांची फसवणूक करायची अशी कार्यपद्धती असलेल्या राजस्थानच्या एका टोळीच्या प्रमुखाला बोरिवलीच्या एमएचबी पोलिसांनी जोधपूरच्या मंडोर येथे सापळा रचून नुकतीच अटक केली आहे.

बोरिवली पश्चिम येथील व्यापारी निर्मित संजय अजमेरा यांनी 17 लाख 65 हजार रुपये किमतीचे केमिकल ललितपुमार भगवानराम बिष्णोई (36) यास ट्रान्सपोर्टद्वारे पाठविले होते, परंतु ललितपुमारने बनावट आधारकार्ड व बनावट नावाचा वापर केला होता. केमिकल पाठविल्यावर त्याने पेमेंट केल्याचे बनावट स्क्रीन शॉटही पाठविले. बँक खात्यात पैसे जमा न झाल्याने अजमेरा यांनी एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांच्याकडे धाव घेतली. सोनवणे यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिपुमार मीना, उपायुक्त संदीप घुगे, एसीपी सुधाकर हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. जोधपूर मंडोर येथे जोधपूर पोलिसांच्या सायबर सेलची मदत घेऊन ललितपुमार बिष्णोई व त्याचा साथीदार विकास बिष्णोई यास सोनवणे यांच्या सहकाऱयांनी सापळा रचून अटक केली.

पोलीस निरीक्षक मिलिंद नागपुरे, श्रीकांत मगर, पोलीस हवालदार संदीप परीट, सतीश देवकर, अर्जुन आहेर, सचिन मंजुळे, सिद्धेश पाटील यांनी या कारवाईत भाग घेतला. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी बनावट पंपनी स्थापन करून महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, हरयाणा, राजस्थान येथील व्यापाऱयांची बनावट पेमेंट स्क्रीन शॉट पाठवून करोडो रुपयांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झालेले आहे.