
परळी तालुक्यातील बाड येथे दहिफळे कुटुंबात तब्बल चार पिढय़ांनंतर कन्यारत्नाचा लाभ झाला. जवळपास दोनशे वर्षांनी घरात मुलीचा जन्म झाल्याने आनंदित झालेल्या तिच्या आजोबांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि रथातून मिरवणूक काढत तिचे जंगी स्वागत केले.
‘नात’ झाल्याचे समजताच चिमुकलीच्या आजोबांसह तिच्या सर्व नातेवाईकांचा उत्साह शिगेला पोहोचला. त्यांनी या चिमुकलीचे नामकरण करत गार्गी असे नाव ठेवण्याचे ठरवले आहे. चिमुकलीचा जन्म हा उत्सवासारखा साजरा करण्याची इच्छा व्यक्त करत दहिफळे कुटुंबीयांनी रुग्णालयातूनच तिची रथातून मिरवणूक काढली आणि वाजतगाजत घरी आणले.




























































