मणिपुरमध्ये 80 कोटी रुपयांची ब्राऊन शुगर जप्त, एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात आसाम रायफल्स, सीआरपीएफ आणि जिरीबाम पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत 80 कोटी रुपये मूल्याची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिरीबाम क्षेत्रातील माखा बस्ती येथे गुरुवारी गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान आरोपीकडून 10.891 किलोग्रॅम ब्राऊन शुगर हस्तगत करण्यात आली. जप्त केलेला अंमली पदार्थ आणि अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी जिल्हा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मणिपूरमध्ये तीन वर्षांपूर्वी उफाळलेल्या जातीय हिंसाचारानंतर सुरक्षा दलांकडून सातत्याने शोध मोहिमा राबवल्या जात आहेत. मे 2023 पासून मैतेई आणि कुकी-झो समुदायांमध्ये सुरू असलेल्या हिंसेत आतापर्यंत 260 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेघर झाले आहेत.