शी जिनपिंग गलवान संघर्षानंतर प्रथमच हिंदुस्थानात येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात 12 आणि 13 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हिंदुस्थानात येणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली असून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर प्रथमच जिनपिंग यांचा हिंदुस्थान दौरा होणार आहे. या भेटीदरम्यान जिनपिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे. ब्रिक्स शिखर संमेलनात चीन आणि रशियासह 11 सदस्य देशांचे नेते सहभागी होणार आहेत. जिनपिंग यांच्याशिवाय रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हेदेखील या संमेलनात सहभागी होणार असून रशियाची विमाने हिंदुस्थानात दाखल झाली आहेत. बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रेहमान हे संमेलनात सहभागी होणार नाहीत. पंतप्रधानांना निमंत्रण मिळाले नसून ‘बिमस्टेक’च्या अध्यक्षांना निमंत्रण मिळाल्याचे बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री हुमायूं कबीर यांनी सांगितले.