‘शहजाद भट्टी नेटवर्प’ दहशतवादी संघटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘शहजाद भट्टी नेटवर्प’ला ‘बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम’ अंतर्गत दहशतवादी संघटना घोषित केले आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भट्टीचा गट शस्त्रे, स्फोटके आणि अमली पदार्थांची तस्करी करतो. तसेच, तरुण आणि किरकोळ गुन्हेगारांना दहशतवादी बनण्यासाठी प्रवृत्त करतो, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. तपास यंत्रणांनी 12 ऑगस्ट रोजी 14 राज्यांमध्ये कारवाई करत नेटवर्पमधील 200 हून अधिक लोकांना अटक केली होती. यंत्रणांनी राज्य पोलीस दलांसोबत संयुक्त मोहीम राबवली होती.