तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवले, निवडणूक आयोगाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडवून देणारा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. आगामी पश्चिम बंगाल विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाचे नाव आणि त्यांचे अधिकृत गवत आणि फुले हे चिन्ह गोठवले आहे.

तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या दोन गट निर्माण झाले आहेत. एक गट राज्याच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील आहे, तर दुसरा गट ऋतब्रत बॅनर्जी यांचा आहे. पक्षाचे मूळ नाव आणि निवडणूक चिन्हावर दोन्ही गटांनी दावा सांगितल्यामुळे हा वाद निवडणूक आयोगासमोर पोहोचला होता.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या गटाचे प्रतिनिधित्व राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन आणि इतर चार जणांनी केले. तर दुसऱ्या गटाची बाजू स्वतः ऋतब्रत बॅनर्जी यांनी आयोगासमोर मांडली. आगामी विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये या दोन्हीपैकी कोणत्याही गटाला तृणमूल काँग्रेस हे नाव आणि पक्षाचे राखीव निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. तसेच आता दोन्ही गटांना आता स्वतःसाठी नवीन नावे सुचवण्याचे आणि आयोगाकडे उपलब्ध असलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून नवीन चिन्ह निवडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.