उद्योगमंत्री परदेशात… उद्योग फरार! छत्रपती संभाजीनगरमधून 1914 कोटी रुपयांचा उद्योग परत गेल्यावरून दानवे यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन DMIC मधील अमेरिकन कंपनी लुब्रिझोलने तब्बल 1,914 कोटी रुपयांच्या प्रस्तावित गुंतवणुकीतून माघार घेत 120 एकरांचा भूखंड रिकामा केला आहे. यावरून शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी “उद्योगमंत्री परदेशात… उद्योग फरार!” असे म्हणत दानवे यांनी उद्योगमंत्र्यांवर टीका केली आहे. तसेच “पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही” असे म्हणणारे, आता उद्योगांचा दुष्काळ पाडू नका फक्त!, असा टोला दानवे यांनी सरकारला लगावला आहे.

“उद्योगमंत्री परदेशात.. उद्योग फरार!” असे म्हणत दानवे यांनी उद्योगमंत्र्यांवर टीका केली. 17 सप्टेंबरच्या ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी’ मुख्यमंत्री भाषण करत असताना मराठवाड्याला हेच ‘रिटर्न गिफ्ट’ मिळाले का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन DMIC मधून अमेरिकन ‘लुब्रिझोल’ कंपनीने 1,914 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून माघार घेतली असून 120 एकरांचा भूखंड रिकामा केला आहे. त्यामुळे या भूखंडाचा आता नव्या गुंतवणूकदारासाठी वापर करता येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

लुब्रिझोलने यापूर्वी बिडकीनमध्ये 120 एकरांचा भूखंड घेत भारतातील मोठा उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना जाहीर केली होती. कंपनीच्या सुरुवातीच्या प्रकल्पासाठी सुमारे 200 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक प्रस्तावित असल्याचे 2024 मध्ये जाहीर करण्यात आले होते.

“पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही” असे म्हणणारे, आता उद्योगांचा दुष्काळ पाडू नका फक्त!, असा टोला दानवे यांनी सरकारला लगावला आहे.