
हरियाणातील सोनीपतच्या सिक्का कॉलनीमध्ये सहा महिन्यांच्या चिमुकल्यावर पिटबुल कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात बाळ गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर सध्या रोहतक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळाची आत्या त्याला घेऊन रस्त्यावरून जात असताना अचानक पिटबुल कुत्रा त्यांच्याकडे धावत आला. कुत्र्याने बाळाला पकडून त्याच्यावर हल्ला केला. बाळाला वाचवण्यासाठी आत्याने प्रयत्न केला असता कुत्र्याने तिच्यावरही हल्ला केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पिटबुल बाळावर झडप घालत असल्याचे दिसत आहे.
हल्ल्यात सहा महिन्यांचे बाळ गंभीर जखमी झाले. त्याला सुरुवातीला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी रोहतक येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या बाळावर तेथे उपचार सुरू आहेत.
सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पिटबुलसारख्या धोकादायक जातीच्या कुत्र्याला परिसरात ठेवताना संबंधित मालकाने आवश्यक नियमांचे पालन केले होते का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. कुत्र्याच्या मालकाची जबाबदारी काय होती आणि अशा कुत्र्याच्या पालनासंदर्भातील नियमांचे पालन झाले होते का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
हरियाणातील सोनीपतच्या सिक्का कॉलनीत सहा महिन्यांच्या चिमुकल्यावर पिटबुल कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात बाळ गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. pic.twitter.com/XVmrbGF8n0
— Saamana Online (@SaamanaOnline) September 18, 2026


























































