दिल्लीत अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिची चाकूने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या करण्यात आल्यानंतर तिचा मृतदेह शेतात फेकण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात तीन अल्पवयीन मुलांसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उत्तर-पश्चिम दिल्लीतील स्वरूप नगर परिसरातील कुशक रोडवरील जयपाल राणा यांच्या शेताजवळ एका मुलीचा मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. मृतदेहाचे काही भाग भटक्या कुत्र्यांनी खाल्ले होते. तसेच तिचा एक हात शरीरापासून वेगळा झालेला सापडला. मृतदेह कुजल्यामुळे सुरुवातीला ओळख पटवणेही कठीण झाले. मुलगी तिच्या 17 वर्षीय मित्राला भेटण्यासाठी गेली होती. त्याने आपल्या तीन मित्रांना बोलावले. चौघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.