गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा आणि वारसा डिजिटल स्वरूपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील गणेशोत्सवाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, धार्मिक प्रथा, कौटुंबिक आठवणी, कलात्मक सजावट आणि समाजोपयोगी उपक्रमांचे डिजिटल स्वरूपात दस्तऐवजीकरण करून ते पुढील पिढय़ांसाठी जतन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत Bappa.org हा डिजिटल उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात मुंबईतील नागरिक, गृहनिर्माण संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच मंदिर न्यासांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

मुंबई शहर, उपनगरातील विविध भागांमध्ये घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जोपासल्या जात आहेत. या डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरातील तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाशी संबंधित गणेशमूर्ती, सजावट, पारंपरिक प्रथा, आरत्या, कुटुंबीयांच्या आठवणी, उत्सवातील अनुभव, पारंपरिक पाककृती, ऐतिहासिक संदर्भ, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सामाजिक कार्य यांची माहिती नोंदवता येणार आहे. यासाठी नागरिकांन `Bappa.org’ या संकेतस्थळावर श्रीगणेशमूर्ती अथवा सजावटीचे छायाचित्र अपलोड करून त्यासोबत आपल्या परंपरेविषयी, देखाव्याविषयी किंवा सामाजिक उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती नोंदवावी.