Asian Games 2026 मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी; वेटलिफ्टिंगमध्ये पटकावले रौप्यपदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा इतिहास रचला आहे. महिलांच्या ४९ किलो वजनी गटात शानदार कामगिरी करत मीराबाईने रौप्यपदक पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील मीराबाईचे हे पहिलेवहिले पदक ठरले आहे.

या स्पर्धेत उत्तर कोरियाच्या री सोंग-गुम हिने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. री सोंग-गुमचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे सलग तिसरे सुवर्णपदक आहे.

या ऐतिहासिक कामगिरीसह मीराबाई चानूने भारताच्या पदक तालिकेत मोलाची भर घालत क्रीडा जगतात पुन्हा एकदा तिरंगा फडकवला आहे.