‘एसव्हेक्टर’चा आयपीओ शुक्रवारी उघडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्नॅपडील या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी ‘एसव्हेक्टर’चा ‘आयपीओ’ लवकरच शेअर बाजारात येणार आहे. हा आयपीओ शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी उघडणार असून २९ सप्टेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. कंपनीने एक रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरची किंमत ३० ते ३२ रुपये ठेवली आहे. गुंतवणूकदारांना किमान ४६८ किंवा त्याच्या पटीत शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. या आयपीओद्वारे एकूण ४१, ५६२,५०० शेअर्सची विक्री करण्यात येणार असून सुमारे २८ हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याची कंपनीची योजना आहे.