
मुंबई क्राईम ब्रँचमधून अलीकडे सेवानिवृत्त झालेले बिसूर गावचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) व्यंकट पाटील यांची तिसरे ग्रामीण मराठी सांगली जिल्हा साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून नोव्हेंबर २०२६ ला दोन दिवसांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी स्वागताध्यक्षपदी विसूर गावचे लेखक व्यंकट पाटील यांची निवड करण्यात आल्याची माहिती मायाक्का बिरुदेव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आनंदा टकले यांनी दिली.
राष्ट्रपदी पोलीस पदक विजेते व्यंकट पाटील यांचे ‘घात’, ‘घर हरवलेला पोलीस’, ‘वारसा’, ‘यशवंता’, ‘सर्जा’, ‘कोब्रा’, ‘मायनस वन’, ‘प्रेमतरंग’ आदी कादंबऱ्या, कथा व कविता संग्रह प्रकाशित झाले असून त्यांना सुमारे दोन डझन विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.





























































