
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत आयोगावर गंभीर आरोप केले.
“या निवडणूक आयोगाने भारताला जगातील सर्वात मोठी माजी लोकशाही बनवले आहे,” असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. एका पक्षासाठी एजंट म्हणून काम करत हिंदुस्थानातील लोकशाही संपवण्याचे काम केले जात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. “लाखो हिंदुस्थानींचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराची सुरुवात झाली होती, असे त्यांनी नमूद केले. मात्र, आता याच व्यवस्थेचे रूपांतर निवडक मतदार याद्यांमध्ये करण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला.
“हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराने जी सुरुवात झाली होती, ती आता या संस्थेने निवडक मतदार याद्यांमध्ये बदलली आहे,” असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
निवडणूक आयोग पूर्वी निष्पक्ष संस्था म्हणून ओळखला जात होता, मात्र आता त्याच संस्थेवर विश्वास ठेवता येत नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. “एकेकाळी निष्पक्ष असलेली ही संस्था आता फसवणूक करणारी संस्था बनली आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
आदित्य ठाकरे यांची ही टीका SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित होत असतानाच्या पार्श्वभूमीवर आली आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी SIR प्रक्रियेशी संबंधित विविध निर्णयांवर आक्षेप नोंदवले होते.
This @ECISVEEP has transformed India into the world’s largest former democracy!
Working as agents for one Party, to finish off India’s democracy, they have snatched away the voting rights of millions of Indians.
What started off with Universal Adult Franchise when India won… https://t.co/4AzAFuseJI
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 23, 2026



























































