राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताहेत हे पाप आणि हा गुन्हा फडणवीस सरकारचा आहे; संजय राऊत कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात भयंकर दुष्काळी परिस्थिती असतानाच शनिवारी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच सरकारमधील मंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीवर प्रतिक्रीया येत आहेत. यासंदर्भोत बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे भाष्य केले. दुष्काळात साधेपणाने लग्न करा असे विखे पाटील यांचे विधान होते. यावर यावर संजय राऊत म्हणाले या सर्व सूचना चांगल्या आहेत परंतु या सूचना त्यांच्यासारखी श्रीमंत घराणी आहे त्यांनी लक्षात ठेवायला हव्यात. पैशाचा माज सम्राट लोक दाखवतात. त्यांनी स्वतःपासून चिंतन करावे. पैशाचा माज आम्ही दाखवतो का? असा प्रश्न यावेळी राऊत यांनी उपस्थित केला.

मागच्या २४ तासात ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार फक्त दुष्काळ जाहीर करून बसलंय. शेतकऱ्याला दिलासा देणारं अजून काही दिलेलं नाही. आत्तापर्यंत आत्महत्या केलेल्या पैकी सर्वात जास्त मराठवाड्यात घडतात हे मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे. सरकार झोपलेले होते त्यामुळे ५५० पेक्षा जास्त आत्महत्यांचं पाप हा गुन्हा फडणवीस सरकारचे आहे.

राम मंदिर चोरी प्रकरणात चंपत राय यांना क्लिन चिट यावर बोलताना राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्षाची तपास यंत्रणा आहे. त्यामुळे कोणाला गुंतवायचं कोणाला सोडवायचं हे पक्ष ठरवतो. चंपत राय हे त्या ट्रस्टचे प्रमुख होते. त्यांची जबाबदारी होती तिजोरीचं रक्षण करणं. तिजोरी १०५ वेळा लुटली गेली.. हे आम्ही सांगत नाही एसआयटी सांगतंय कोर्टात आरोपपत्र दाखल झालं आहे. अशी एकही चोरी झाली नाही असे फडणवीस म्हणतात. आमच्या मुख्यमंत्र्यांना या चोऱ्या दिसत नाही. अशा वृत्तीचे राज्यकर्ते असतील तर चंपत रायला क्लिन चीट मिळणारच.

निवडणूक आयोगात मॅच फिक्सिंग आणि मतचोरी होते. अमोल किर्तीकर सिट आम्ही जिंकलो. पण वरुन एक फोन आला आणि सांगण्यात आलं या उमेदवाराला विजयी घोषित करा. निवडणूक आयोग या सर्वात मोठे कारणीभूत होतं. बंगालला हरवण्यासाठी निवडणूक आयोगाचे मोठे योगदान आहे. ममता दिदींना तिथे खूप त्रास होतोय. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे यावेळी राऊत म्हणाले.