
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. शनिवारपासून कोसळत असणाऱ्या पावसामुळे गोरखपूर शहरातील अनेक भागात पाणी साचले असून नागरिकांचे हाल होत आहेत. पाणी तुंबल्याच्या प्रश्नावरून भाजप खासदार रवि किशन आणि स्थानिक नगरसेवक विश्वजीत त्रिपाशी यांच्यात फोनवर चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याचे समोर आले आहे. दोघांमधील संभाषणाचा ऑडिओ आणि त्यानंतरचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गोरखपूरमधील बेतियाहाता परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना होत असलेल्या त्रासाची माहिती देण्यासाठी नगरसेवक विश्वजीत त्रिपाठी यांनी रवि किशन यांच्याशी फोनवर संपर्क साधला. मात्र, पाण्याचा निचरा आणि नागरिकांच्या समस्येवर चर्चा सुरू असतानाच दोघांमध्ये वाद झाला. यावेळी रवि किशन यांनी भोजपुरी भाषेत ‘का हो, सपा जॉइन कई लेहला का?’ असा सवाल केल्याचे व्हायरल ऑडिओमध्ये ऐकू येत आहे.
यावर त्रिपाठी यांनीही नाराजी व्यक्त केली. आपण केवळ शहरातील परिस्थिती आणि नागरिकांच्या अडचणी सांगत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यानंतर त्यांनीही रवि किशन यांना ‘तुम्ही बसपा जॉइन केली आहे का?’ असा प्रतिप्रश्न केल्याचे समोर आले आहे.
रामगढताल परिसरातील परिस्थितीवरूनही दोघांमध्ये मतभेद झाल्याचे सांगितले जात आहे. नगरसेवकाने रामगढतालच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून व्हिडीओ करत तेथील परिस्थिती दाखवली. तसेच, खासदारांनी आपण याच ठिकाणी असल्याचे सांगितले होते, मात्र ते प्रत्यक्षात तेथे दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, या वादाचा ऑडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने भाजपवर टीका केली. जरा विचार करा, जे स्वतःच्याच पक्षाच्या नगरसेवकाचे ऐकून घेत नाहीत, ते सामान्य जनतेबद्दल काय विचार करत असतील? ही भाजपची हीन मानसिकता आहे. त्यांना जनतेची अजिबात पर्वा नाही, पण कोणी प्रश्न विचारला की ते अशा क्षुद्र गोष्टींचा आधार घेतात. त्यांना लाज वाटायला हवी, अशी टीका काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर करत केली.
BJP पार्षद ने गोरखपुर के BJP सांसद रवि किशन से इलाके में भयंकर जलभराव की शिकायत की।
इस पर सांसद जी भड़क गए और बोले: “सपा जॉइन कर लिए हो क्या?”
जरा सोचिए- जो लोग अपनी ही पार्टी के पार्षद की नहीं सुन रहे, वो आम जनता को क्या समझते होंगे!
यही BJP की घटिया मानसिकता है।
इन्हें जनता… pic.twitter.com/Gjv4FDfC4E
— Congress (@INCIndia) September 26, 2026
























































