विना नोंदणी कीटकनाशकांची विक्री; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला 25 लाखांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाईन पोर्टलवरून कीटकनाशकांची विक्री अॅमेझॉन, फ्लिपकार्टला भोवली आहे. विना नोंदणी कीटकनाशकांची विक्री केल्याप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) अॅमेझॉन, फ्लिपकार्टला दणका दिला असून याप्रकरणी 25 लाखांचा दंड ठोठावला आहे. प्राधिकरणाने कीटकनाशक औषध सायक्लोसिनोन हर्बिसाइड विकल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

या औषधाची सर्वात मोठी बाजारपेठ अॅमेझॉनवर तयार झाली होती. अॅमेझॉनच्या माध्यमातून या कीटकनाशकाच्या एपूण 43 हजार 634 पाकिटांची विक्री झाली असून त्यांची किंमत 96.43 लाख रुपये होती. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रत्येकी 10 लाख, तर अन्य एका पंपनीला  5 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सीसीपीएने या औषधाच्या विक्रीवर आणि त्याच्या जाहिरातीवर तत्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

कंपन्यांकडून थेट विक्री

सायक्लोसिनोन नावाचे रसायन सरकारच्या कीटकनाशक कायदा 1968 मधील यादीत समाविष्ट नाही तसेच औषध, पिके, माती किंवा मानवांसाठी किती सुरक्षित आहे व परिणामकारक आहे याची सरकारकडून कोणतीही कायदेशीर तपासणी किंवा गुणवत्ता चाचणी करण्यात आलेली नव्हती. तरीदेखील कंपन्यांकडून त्याची थेट विक्री सुरू होती.