
उद्या, 1 ऑक्टोबर 2026 पासून व्हॉट्सअॅपच्या बिझनेस प्लॅटफॉर्मवर पाठवल्या जाणाऱ्या मेसेजवर पैसे द्यावे लागतील. प्रत्येक बिझनेस नंबरला महिन्यातील पहिले 1,000 सेवा संदेश मोफत मिळतील. त्यानंतर कर्मचारी किंवा चॅटबॉटद्वारे पाठवलेल्या प्रत्येक संदेशासाठी शुल्क आकारले जाईल.
सामान्य व्हॉट्सअॅप यूजर्सला मेसेजसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. हे फिचर आधीसारखे मोफतच राहील. तसेच ग्राहकांकडून कंपनीला पाठवलेल्या मेसेजवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सामान्य व्हॉट्सअॅप आणि छोटय़ा व्यवसायांसाठी असलेल्या मोफत व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपवर हा नियम लागू होणार नाही. सर्व मेसेजसाठी शुल्क आकारले जाणार नाही.

























































